...आणि सेना मंत्र्यांचे राजीनामे खिशातच राहिले !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 11:54 PM IST

...आणि सेना मंत्र्यांचे राजीनामे खिशातच राहिले !

ravate_varsha_meetप्रफुल्ल साळुंखे, मुंबई

08 फेब्रुवारी : सरकार व्हेंटिलेटरवर आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात सांगितलं. दुसऱ्याच दिवशी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री निवसस्थान गाठलं आणि वातावरण तापले. पण शिवसेना मंत्र्यांचे खिशातले राजीनामे खिशातच राहिले. आणि युतीतल्या आणखी एका नाटकावर पडदा पडला.

गेले काही दिवस शिवसेना भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप करत, आरोपांची तळ गाठालाय. त्यातच सरकार व्हेंटिलेटरवर असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यात सर्व मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरू लागले.  शिवसेना मंत्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार या बातमीने खळबळ उडाली. शिवसेना मंत्री मुख्यामंत्री निवासस्थान गाठलं. मुख्यामंत्री यांच्याशी भेटून उत्तरप्रदेश प्रमाणे राज्यातही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही मागणी या मंत्र्यांनी केली. राजीनामा नाट्याचा एका अंकावर पडदा पडला. मंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवत मुख्यमंत्री निवासस्थान सोडले. एकाच काय तर राजीनामा नाटकात सध्यातरी सैनिकांनी तलवार म्यान केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 11:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...