सेना मंत्र्यांच्या राजीनाम्याचा चर्चेला पूर्णविराम

  • Share this:

shiva sena 108 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकमेकांवर आगपाखड करणारे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर जाणार असल्यामुळे सेनेचे मंत्री राजीनामा देतील अशी चर्चा रंगली होती पण त्याला आता पूर्णविराम मिळालाय. शेतकऱ्यांचं कर्जमाफ करावं अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केल्याची कळतेय.

शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर एकदाही टीका करण्याची संधी सोडत नाहीये. मात्र, दुसरीकडे संध्याकाळी शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, दीपक केसरकर आणि विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर या नेत्यांनी वर्षा बंगला गाठलाय.

शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामा घेऊन फिरता असं वक्तव्य सेनेचे मंत्री रामदास कदम यांनी केलं होतं. त्यामुळे सेना आता सत्तेतून बाहेर पडणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

रात्री 10 च्या सुमारास शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, दीपक केसरकर आणि विजय शिवतारे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी सेना नेत्यांनी केलीये. सेना नेते वर्षा बंगल्यावर जाणार असल्याची बातमी आल्यापासून सेना सत्तेतून बाहेर पडते का ? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading