मुख्यमंत्री हे 'अर्धवटराव', उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

  • Share this:

uddhav_in_ekvira08 फेब्रुवारी : आता मुख्यमंत्री म्हणतात की मुंबई महापालिका पहिली नाहीतर तिसरी आहे. अहवाल चुकीचा आहे. मग  केंद्रात अहवाल तयार करणारी काय गाढवं बसली आहे का ? अशी पलटवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री फडणवीस हे अर्धवटराव आहे अशी खिल्लीच उद्धव ठाकरे यांनी उडवली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कांदिवलीमध्ये सभा पार पडली. त्यांच्या सभेच्या आधी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलुंडमध्ये सभा झाली होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका पारदर्शकमध्ये नंबर वन नसल्याचा दावा खोडून काढला. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी लगेच समाचार घेतला.

राम मंदिर बांधलंय, पण पारदर्शी असल्याने दिसत नाही. मुळात नरेंद्र मोदी हे मग्रुर तर फडणवीस हे दीणवाणे मुख्यमंत्री आहे. त्यांनी केंद्राचा अहवाल चुकीचा ठरवलाय. पण, जो अहवाल तुम्ही चुकीचा ठरवत आहात तो तुमच्याच केंद्रातल्या सरकारने तयार केला. मग केंद्रातले अहवाल तयार करणारे गाढव होते का ? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

पाटना आणि मुंबईची तुलना करायची असेल हा दोन्ही शहराचा अपमान आहे. जर मुंबईची आम्ही पाटना केली असेल तर तुम्ही अडीच वर्ष काय तंबाखू चोळत होते का ? आम्ही पाटना केलं असेल तर तुम्ही तरी राजकारण सोडा किंवा मी तरी राजकारण सोडतो असं आवाहनच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

मुंख्यमंत्रिपदाची झूल अंगावर आहे म्हणून काहीही बोलू नका आणि खोटंतरी बोलू नका असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.  मोदींच्या फोटोवर मत मिळत नाही म्हणून जाहीरनामा स्टँम पेपरवर काढला अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 09:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading