पारदर्शक कारभारात मुंबई पालिका पहिली नाही तिसरी -मुख्यमंत्री

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 09:41 PM IST

पारदर्शक कारभारात मुंबई पालिका पहिली नाही तिसरी -मुख्यमंत्री

cm_on_uddhav08 फेब्रुवारी : पारदर्शक कारभारात मुंबई महापालिकेचा पहिली नाहीतर तिसरा क्रमांक आलाय. टेंडरिंगमध्ये जर गूण द्यायचे ठरले असते तर शेवटचा क्रमांक आला असतात असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेवर केला. तसंच मुंबईचा विकास हा पाटना शहरासारखा झाला अशी तुलनाच मुख्यमंत्र्यांनी केली.

मुलुंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी शिवसेनेच्या पारदर्शक कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. केंद्राचा पारदर्शक कारभाराचा अहवालाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दाव्याची चिरफाड केली.

शिवसेनेने केंद्राचा अहवाल दाखवून पारदर्शक असल्याचे होर्डींग लावले. पण पहिला क्रमांक हैद्राबादचा, दुसरा क्रमांकावर बेंगलोर आहे. आणि तिसरा क्रमांक मुंबईचा आहे असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे सेनेनं आता ते होर्डिंग काढून टाकावे असा टोलाच मुख्यमंत्र्यांनी लगावला.

ज्या चार गोष्टींसाठी मुंबईचा क्रमांकवर आला त्या गोष्टी राज्यसरकारशी निगडीत आहेत. इतर महापालिकेच्या मुल्यांकनामध्ये शून्य मार्क मिळाले. सात वर्षांपासून ऑडिटला परवानगीच दिलेली नाही. याच उत्तर उध्दव ठाकरे यांनी दिलं पाहिजे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

तसंच पारदर्शकतेच्या सर्व मुद्यावर शिवसेनेला शून्य मार्क मिळाले 'मुंबई का इतना विकास हो गया की पटना के साथ खडा हो गया' अशी नक्कलच मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवली. तसंच नागरीकांच्या सहभागाबाबत मुंबई पाटनाच्या बरोबर आहे.  यात उध्दव ठाकरेंचा दोष नाही त्यांचे सल्लागार आहे त्यांनी ठरवूनच टाकलय यांना गार करून टाकायचं असा टोलाही त्यांनी लगावला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...