मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजप-आरपीआयचा काडीमोड

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजप-आरपीआयचा काडीमोड

  • Share this:

athwale_And_cm08 फेब्रुवारी : उल्हासनगर, ठाण्यानंतर आता नागपुरातही आरपीआय-भाजप युती तुटलीये. आरपीआयला दिलेल्या जागेवरच भाजपने उमेदवार उभे केल्यामुळे आरपीआयने काडीमोड घेतलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आरपीआयला भाजपनं नागपुरात 19 जागा सोडल्या होत्या. पण भाजपाने आरपीआयच्या 7 जागांवर आपलेच उमेदवार उभे केले. त्यामुळे आरपीआयचा विश्वासघात झाल्याची भावना आरपीआयच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे.

नागपूर महानगर पालिकेत भाजप आरपीआय युती संपुष्टात आलीय. भाजपने कमळ या चिन्हासह आरपीआयसाठी एकच जागा सोडली होती. त्याचा निषेध करत आरपीआयनं आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2017, 7:30 PM IST

ताज्या बातम्या