अर्धी देऊन काय झालं ?,आता संपूर्ण सत्ता द्या -मुख्यमंत्री

अर्धी देऊन काय झालं ?,आता संपूर्ण सत्ता द्या -मुख्यमंत्री

  • Share this:

fadanvis_jalana3408 फेब्रुवारी : एक हाती जिल्हा परिषदेची सत्ता द्या., निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्या. अर्धे अर्धे दिले तर काय होत हे तुम्ही पाहिलंय अशी भावनिक साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील मतदारांना घातली.

जालना जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची आज भोकरदन तालुक्यातील राजूर इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि आमदारांची उपस्थिती होती.

जालना हा रावसाहेब दानवे यांचा जिल्हा आहे. आता अर्ध अर्ध नकोय एक हाती सत्ता द्या असे मुख्यमंत्री म्हणाले.

तर रावसाहेब दानवे यानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हणाले की, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटात मोत्याचा घास तुला भरविते. तसंच अशोक चव्हाण म्हणतात भाजपावाले शेतकऱ्यांच्या बाबत थापा मारतात. तुम्ही आणि तुमचे वडील मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केले असा सवाल देखील दानवे यानी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 07:15 PM IST

ताज्या बातम्या