गावांमध्ये सभा,पदयात्रा काढू नये ; गावाकऱ्यांनी बंद केले रस्ते

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 06:42 PM IST

 गावांमध्ये सभा,पदयात्रा काढू नये ; गावाकऱ्यांनी बंद केले रस्ते

kolhapur_newsसंदीप राजगोळकर, कोल्हापूर

08 फेब्रुवारी : पाणी म्हणजे जीवन...याच पाण्याशिवाय कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही. आणि याच पाण्यासाठी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या 5 गावच्या मतदारांना येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. इतकच नाही तर राजकीय नेत्यांना आणि पक्षांना या गावांमध्ये सभा, पदयात्रा, मेळावे घेण्यास बंदी घालून प्रचारासाठीचे रस्ते बंद केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातून हिरण्यकेशी नदी वाहते पण नदीतला पाणीसाठी सध्या संपलाय. त्यामुळे नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, खणदाळ, इचरगुच्ची या गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे या गावांमधल्या सार्वजनिक फलकांवर एक संदेश लिहिण्यात आलाय आणि त्याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

कायमची पाण्याची सोय होईपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद घालून येत्या मतदानावर हा बहिष्कार घालण्यात आलाय. त्यामुळे निवडणुकाजवळ आल्या की आश्वासनं देणारे नेते पुन्हा या गावांमध्ये जाऊन आश्वासनं देणार की या गावांमध्ये कायमचे पाणी मिळणार हे येत्या काही दिवसांमध्ये पाहावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...