बेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा एका दिवसाआधीच निघणार

बेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा एका दिवसाआधीच निघणार

  • Share this:

belgum_maratha_morcha08 फेब्रुवारी : बेळगामध्ये येत्या 17 तारखेला मराठा क्रांती मोर्चा आता 16 तारखेला निघणार आहे. बेळगाव पोलिसांनी 16 तारखेला विनाअट या मोर्चाला परवानगी दिलीय. त्यामुळे ही तारीख बदलण्यात आलीय.

मोर्चाचे संयोजक यांनी काल बेळगाव पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांची भेट घेतली. तब्बल 2 तासांच्या चर्चेनंतर बेळगाव पोलिसांनी 16 तारखेला मोर्चाला परवानगी दिलीय. या मोर्चाची बेळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू असून महाराष्ट्रानंतर आता मराठ्यांचा एल्गार हा बेळगावमध्येही पहायला मिळणार आहे.

संभाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून उड्डाण पूल, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि छत्रपती संभाजी महाराज चौक असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. याबाबत पोलिसांनीही मार्गाची पाहणी केली असून त्या दिवशी बेळगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान मोर्चासाठी मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आलं असून झेंडे, पोस्टर्स, टोप्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीही या मोर्चात सहभागी होणार असून सीमाप्रश्नाबाबतचा ठरावही या मोर्चात मांडण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 06:32 PM IST

ताज्या बातम्या