आता महापौरपदासाठी पप्पू कलानींची कमिंग 'सून' !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 07:20 PM IST

आता महापौरपदासाठी पप्पू कलानींची कमिंग 'सून' !

pancham_kalani408 फेब्रुवारी : उल्हासनगरचे माजी आमदार आणि जेलमध्ये असलेल्या पप्पू कलानींची सून पंचम कलानी महापालिका निवडणुकीच्या माध्यामातून राजकारणात पदार्पण करतेय.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि सद्द्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांची सून पंचम कलानी ही महापालिका निवडणुकीच्या द्वारे राजकारणात पदार्पण करत आहे.  भाजपसोबत गेलेल्या टीम ओमी कलानीचा चेहरा पंचम कलानी असणार आहेत.

ओमी कलानींचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं आता कलानी कुटुंबातल्या पंचम या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यात. उल्हासनगरचं महापौरपद महिलेसाठी राखीव असल्यानं पंचम यांच्याकडे महापौरपदाच्या उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. ओमी कलानी यांची पंचम ही दुसरी बायको आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत, त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरला. ओमी कलानी यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...