चीनमध्ये 500 जणांचा फॅमिली फोटो

Sonali Deshpande | Updated On: Feb 8, 2017 05:36 PM IST

 चीनमध्ये 500 जणांचा फॅमिली फोटो

08 फेब्रुवारी : तुम्ही जर तुमचा फॅमिली फोटो काढायचं ठरवलंत तर किती जणांना बोलवाल ? विचारात पडलात ना ? या फॅमिली फोटोची आठवण झाली कारण चीनमध्ये एका कुटुंबातले 500 जण एकत्र आले आणि त्यांनी असा फॅमिली फोटो काढला.

चीनमधल्या झेजियांग प्रांतातल्या शिशे नावाच्या गावात रेन कुटुंबीयांनी हा फोटो काढलाय. चीनमध्ये नववर्ष साजरं करताना सगळ्या कुटुंबीयांनी एकत्र येण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने रेन कुटुंबीयांचे सगळे 500 सदस्य जमले होते. फोटोग्राफर झँग लिअँगझोंग यांनी या सगळ्यांचा ड्रोनद्वारे फोटो घेतला.

शिशे गावातल्या रेन कुटुंबीयांनी आपल्या 7 पिढ्यांच्या नोंदी जमवल्या आणि 2000 नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यातले 500 जण या फॅमिली फोटोच्या वेळी एकत्र आले.

आपल्या नात्यागोत्यांतले किती जण नेमके कुठे आहेत, कुठपर्यंत पसरलेले आहेत हे जाणून घेण्याचा यामागे हेतू होता. कुटुंबातल्या वयोवृद्ध आणि जाणत्या लोकांनी लहान सदस्यांना भेटवस्तू आणि आशीर्वाद दिले. त्यासोबतच या भेटीगाठींतून नव्याने संवाद सुरू झाला, असं रेन कुटुंबातल्या एका सदस्याने सांगितलं.

चीनमधल्या या रेन कुटुंबीयांप्रमाणे सगळ्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना भेटण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते ?

अशा प्रकारे आपल्या मूळ गावात नवं वर्ष साजरं करायला हरकत नाही ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 03:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close