हार्दिक पटेलला राजकीय समज नाही -रामदास आठवले

  • Share this:

rAMDAS1208 फेब्रुवारी : प्रचारामध्ये हार्दिक पटेलला आणून सेनेला काहीही फायदा होणार नाही. त्याला अजिबात राजकीय समज नाही, अशी टीका रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली.

लाखोंचे मोर्चे आम्ही पण काढले पण त्यानी काही मत मिळत नाही. अनेक ठिकाणी भाजपने युतीची आचारसंहिता मोडली आहे. जिथे युती झाली नाही तिथे भाजपने माझा फोटो वापरू नये असंही आठवले यांनी भाजपला बजावलंय.

तसंच निवडणुकीनंतर सेना भाजपाला एकमेकांची गरज पडेल त्यामुळे दोघांनीही टोकाची टीका करू नये असा सल्लाही आठवलेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading