राज ठाकरे राजकारणासाठी अनफिट -संजय राऊत

 राज ठाकरे राजकारणासाठी अनफिट -संजय राऊत

  • Share this:

sanjay_raut08 फेब्रुवारी : उद्धव ठाकरेंना मी सात वेळा फोन केले असं जाहीर करणं हे चुकीचं आहे. राजकारणात आपल्याकडील गुपीत जो जाहीर करतो तो राजकारणासाठी सक्षम नसतो असा सल्लावजा टोला शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावलाय. तसंच अमित शहा ज्याप्रमाणे फ्रेंडली मॅच आहे असं म्हणताय तर त्यांना भाजप नेत्यांची चुक कळलीये म्हणून ते बोलताय असंही संजय राऊत म्हणाले.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी चौफेर टोलेबाजी केली. 'सामना' हा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता आहे. सामनाच्या संपादकीय लेखाची दखल देशभरातील वृत्तपत्र घेत असतात. संपादकीय लिहण्यासाठी बाळासाहेबांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच सर्वच घडामोडींवर भाष्य करता येतं. मी त्यांच्यासारखं लिहू शकत नाही पण मी बाळासाहेबांना माझ्यामध्ये आत्मसात केलं असं संजय राऊत म्हणाले.

युतीचा व्हेंटिलेटर उद्धव ठाकरेंनी काढलाय. आता 'ते' गुदरमत आहेत. गेली 25 वर्ष युतीत शिवसेना सडली. पण आता आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन मुक्त झालोय. जो निर्णय बाळासाहेबांना घ्यायचा होता तोच निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. निवडणूक आली की, जागावाटपाचा विषय पुढे येतोय. प्रत्येक वेळा सेना कमी जागेवर लढली. आताही तसाच प्रस्ताव आला. भाजप 227 जागांवर लढण्याचा दावा करतेय पण त्यांना तेवढेही उमेदवार मिळवताना दमछाक झाली. त्यामुळे त्यांना 60 जागा देण्याचा आमचा निर्णय योग्यच होता असंही संजय राऊत म्हणाले.

मला शकुनीमामाची उपमा देताय पण अखेर तो मामाचं होता. शकुनीमामा तसा फार वाईट नव्हता. पारदर्शक म्हणताय आणि यांच्याच सरकारने मुंबई पालिकेला पारदर्शकचं प्रमाणपत्र दिलं. आता त्यांचे खासदार आरोप करताय,  मुख्यमंत्र्यांना आरोप करू द्या, आम्हीही मोदींवर, शहांवर आरोप करू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या भावाविरोधात आरोप झाले पण आम्ही काही बोललो का ? कमरेखालचे वार करणाऱ्यांचं निवडणुकीत काय सुटणार हे कळेलच अशी टीकाही राऊत यांनी केली.

'शरद पवारांच्या जाळ्यात सेना अडकणार नाही'

शरद पवार हे राजकारणात विरोधक असले तरी ते आमचे शत्रू नाहीत. शरद पवार हे काय नवाझ शरीफ आहेत का ? उद्या दिल्लीत मुख्यमंत्री भेटले तर त्यांच्यासोबत चहा घेण्यात कोणताही हरकत नाही. बाळासाहेबांचीच शिकवण होती, राजकारणात मतभेद असू शकता पण मनभेद नसावे असंही राऊत यांनी सांगितलं. पण शरद पवार हे राजकारणात गोंधळ घालतात. त्यामुळे कुणाचा बळी जातो हे नंतर कळतंय. पण शरद पवारांच्या जाळ्यात शिवसेना फसणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.

'राज ठाकरे अनफिट'

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचं भाऊ आहे त्यांनी कितीही फोन करावे किंवा येऊन भेटावे यात दुमत नाही. जर तुम्ही कुणाला फोन केला तर ते उघड करू नये, हा राजकीय मुलमंत्र असतो. जे आपल्याकडील गुपित जगजाहीर करत असतील ते राजकारणासाठी सक्षम नाही असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावलाय. तसंच  आम्हील युती स्वबळावर लढणार ठरल्यावर परत युतीचं ओझं घेणार नाही. महाराष्ट्रात कुणासोबतही युती करणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

'राम मंदिरांची भूमिका व्यवहारिक'

भाजपने राम मंदिराचं राजकारण केलं ते भावनिक नव्हतं, ते व्यवहारिक होतं. वेगळ्या विदर्भाची मागणीही व्यवहारिक आहे.  जेव्हा बाबरी प्रकरण घडलं होतं. त्यावेळी एकही भाजपचा नेता पुढे येण्यासाठी तयार नव्हता. सगळे आरोप शिवसेनेनं आपल्यावर घेतले होते. बाबरी प्रकरणानंतर उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना लढली असती तर 60 ते 65 जागा नक्की होत्या. पण  युपीत लढू नये यासाठी भाजप नेत्यांनी विनंती केली, त्यानंतर बाळासाहेबांनी लढण्याचा निर्णय घेतला नाही. आम्ही काही पाठीत खंजीर खुपसणार नाही अशी भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती. एवढंच काय तर शंकरराव वाघेलांचा शिवसेनेत येण्याचा विचार होता असा खुलासाही संजय राऊत यांनी केला. पण आताची राजकीय परिस्थिती पाहता विश्वासघाताचं राजकारण झालं. शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना लाव्हा आहे अनेकांचे आतापर्यंत हात पोळले आहे असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

'सिंहासन भाग 2 करणार'

 

बाळ कडू सिनेमानंतर मला सिंहासन भाग 2 करण्याचा विचार आहे.  बाळासाहेबांना केंद्रस्थानी ठेवून सिंहासन भाग 2 करण्याची निर्मिती करतोय. बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व काय आहे ते या सिंहासन भाग 2 मधून लोकांना कळू द्यायचंय अशी माहितीही राऊत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 04:07 PM IST

ताज्या बातम्या