नागपूरात संघाचं भाजप उमेदवारांना आव्हान

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर

08 फेब्रुवारी : नागपूर हे मुख्यमंत्र्यांचं शहर... भाजपचा बालेकिल्ला... पण नागपूर महापालिका पुन्हा जिंकणं भाजपसाठी फार सोपं राहिलेलं नाही... कारण अनेक ठिकाणी संघ कार्यकर्त्यांनी थेट भाजप उमेदवारांना आव्हान दिलंय. तर अनेक ठिकाणी भाजपमधूनच बंडखोरी झालीये.

VIJAYADASHMI AND SHASHTRAPUJAN OF RSS:Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat

महापालिका जिंकण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात ही अशी स्थिती आहे. भाजपमधील निष्ठावान उमेदवारी न मिळाल्यानं नेत्यांच्या नावानं शंख करतायेत. पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून पैसे आणि चेहरा या निकषांवर तिकीटं वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजप शहराध्यक्षांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.

उमेदवारी न दिल्यानं काही स्वयंसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. संघाचा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढू शकतो असं सांगत मा गो वैद्यांनी अप्रत्यक्षपणे या बंडखोरांना पाठिंबा असल्याचं सांगितलंय.

भाजपसाठी नागपूर सोप्पं असल्याचं सांगण्यात येतंय. पण बंडखोरी, बंडाळी आणि नाराजांची संख्या पाहता भाजपला विजय सोपा नसणार असं आत्ताच स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 03:17 PM IST

ताज्या बातम्या