सौदीतून 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं

सौदीतून 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं

  • Share this:

Saudi-Passport-office

08 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर निर्बंध घालण्यावर बरीच टीका झाली. मात्र, आता  सौदी अरबिया या मुस्लिम बहुल देशाने गेल्या 4 महिन्यात तब्बल 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं आहे. या सर्व पाकिस्तानी नागरिकांवर सौदी अरेबिया सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सौदी अरेबिया सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मागील चार महिन्यांपासून सौदीमधील वास्तव्य आणि तिथे काम करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 39 हजार नागरिकांना त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांना देशात येण्याची परवानगी देण्याआधी त्यांची कसून चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हा अहवाल देशातील संरक्षण यंत्रणांमधील विविध पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 01:54 PM IST

ताज्या बातम्या