आत्महत्या आणि खुनाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला

  • Share this:

crime08 फेब्रुवारी : सध्या महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हेच कळत नाहीये. घात,अपघात, खून आणि आत्महत्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. अख्खं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतायत.

मुलीला होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून मुलीच्या आईने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सांगलीतील खटावमध्ये घडलीय. आरोपी राहुल पाटील हा या महिलेल्या मुलीची छेड काढत होता. वारंवार त्याने या मुलीला मानसिक त्रास देण्याचाही प्रयत्न केला. या मुलीची ठरलेली दोन लग्नही आरोपीने धमकावल्यामुळे मोडली होती. त्यामुळे व्यथीत झालेल्या मुलीच्या आईंने आत्महत्या केली.

आरोपी राहुलने या मुलीच्या कुटुंबियांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिल्याचा आरोपही या महिलेल्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी भिलवडी पोलिस स्टेशन मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर आरोपी राहुल पाटील हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेतायत. आरोपीच्या शोधात पोलिसांनी पथकंही रवाना केलीत.

अहमदनगरमधल्या लोणी गावात खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी, दोन मुली आणि एका मुलाची बापानेच धारदार हत्याराने हत्या केली. आरोपी उच्चशिक्षीत आहे पण मानसिक संतूलन बिघडल्यामुळे त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

राहता तालुक्यातील देवीचंद ब्राम्हणे हा एम ए बी एड इंग्रजी विषय घेऊन पास झालेला.15 वर्षांपूर्वी त्याचं संगीतासोबत लग्न झालं. पत्नी संगीता, 14 वर्षांची निशा, 12 वर्षांची नेहा आणि 6 वर्षांचा हर्ष यांची त्याने हत्या केली. देवीचंद गेल्या 4 वर्षांपासून मानसिकरित्या आजारी आहे, त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असावं असे आरोपीचे वडील हिराचंद ब्राम्हणे यांचं म्हणणं आहे. दरम्यान संगीताच्या भावाचं, सागर बनसोडेचं म्हणणं आहे की देवीचंदने हे केलं नसावं.

पुण्यात अलिकडेच पत्नी, 2 मुलींची हत्या करून हांडे यांनी आत्महत्या केली. कर्जबाजारी झाल्यानं त्यांनी हे कृत्य केलं.

तर गोंदियात 500रुपयांसाठी डोमनू मेश्राम यांनी 70 वर्षांच्या वडिलांचा खून केला.  मेश्राम यांनी आपल्या शेतातलं एक झाड पाचशे रुपयांना विकलं मात्र ते पैसे आपल्याला दिले नाहीत.या रागाच्या भरात वडिलांना काठीनं मारहाण केली.या मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्रात लागोपाठ झालेल्या या दुर्दैवी घटनांनी महाराष्ट्र सुन्न झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 12:27 PM IST

ताज्या बातम्या