उर्वशी राज ठाकरेची सिनेजगतात एन्ट्री

उर्वशी राज ठाकरेची सिनेजगतात एन्ट्री

  • Share this:

urvashi

08 फेब्रुवारी : राज ठाकरे यांची मुलगी उर्वशीदेखील कला जोपासतेय.काही दिवसांपूर्वी उर्वशीनं फॅशन इंडस्ट्रीत एन्ट्री केली आणि याच ग्लॅमरस दुनियेतून तिला खुणावलंय लाईट्स, कॅमरा आणि अॅक्शन म्हणणाऱ्या सिनेजगतानं.

डेव्हिड धवनच्या आगामी सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून उर्वशी सध्या काम पाहतेय. या सिनेमात वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे तर रोहित धवन हा सिनेमा दिग्दर्शित करतोय.

हा सिनेमा जुडवाचा सिक्वेल असून 29 सप्टेंबरला रिलीज होतोय.खरं तर राज ठाकरेंचं सिनेमाविषयीचं प्रेम सर्वश्रृतच आहे.पण आता ते पूर्ण करण्याचं काम त्यांची मुलगी उर्वशी करतेय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेनं आपलं फेसबुकद्वारे नवी इनिंग सुरू केली आहे. काही तासांतच त्यांच्या फेसबुक पेजला 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.विशेष म्हणजे या पेजवर अमितनं वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट केलं आहे.त्यामुळे ठाकरे कुटुंबाचा कलेचा वारसा आता अमित आणि उर्वशी पुढे घेउन जातायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2017, 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading