श्रीशांत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये करणार कमबॅक?

श्रीशांत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये करणार कमबॅक?

  • Share this:

art_sreesanth_20130516153025545651

08 फेब्रुवारी :  आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकल्यानंतर मैदानाबाहेर असलेला एस श्रीशांत पुन्हा एकदा भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनीच तसे संकेत दिले आहेत.

नुकतंच बीसीसीआयने श्रीशांतला झटका देत, स्कॉटलंड क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर, बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने 2013 मध्ये श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घातली होती. मात्र  आता बीसीसीआय उपाध्यक्ष टीसीबी मॅथ्यू यांनी श्रीशांतच्या बाजूने मत दिलं आहे.

दिल्ली पोलिसांनी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने श्रीशांतची निर्दोष मुक्तता केली होती. पण बीसीसीआयने घातलेली बंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय संबंधित कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळण्यास मनाई आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.

पण 'जर आशिष नेहरा 37 व्या वर्षी टीम इंडियात पुनरागमन करु शकतो, तर श्रीशांतचीही शक्यता  आहे. 33 वर्षीय श्रीशांत हा अजूनही उपयुक्त गोलंदाज आहे. तो साठी घाम गाळतोय', असं मत मॅथ्यू यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2017, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading