काळ आला होता पण...

काळ आला होता पण...

  • Share this:

gadgasgsa

08 फेब्रुवारी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचे प्रत्यय नुकताच कोल्हापूर सांगली रस्त्यावर आले, कार चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट कृष्णा नदीवरच्या पुलावरून कोसळता कोसळता लोखंडी रेलिंगमध्ये अडकली आणि अपघात टळला.

कोल्हापुरहून सांगलीला जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला, आणि कार थेट संरक्षक कठडयावर चढली आणि लोखंडी रेलिंगमध्ये अडकली, मात्र कार थोडिशी रस्त्याच्या बाजूला झुकली होती, खर तर हा अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले होते, 1 इंच जरी गाड़ी उलटी झुकली असती तर थेट 100 फुट खोल नदी पात्रात गाडी गेली असती.  अखेर नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने कार मधील दोघांना सुखरूप बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 08:40 AM IST

ताज्या बातम्या