मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं-पन्नीरसेल्वम

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं-पन्नीरसेल्वम

  • Share this:

Panneerselvam207 फेब्रुवारी : जयललीता यांनीच रूग्णालयात असताना आपल्याला मुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले होते असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांनी केलाय. एवढंच नाहीतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला गेला असा आरोपही पन्नीरसेल्वम यांनी केला.

तामिळनाडूतील राजकीय पेच काही मिटता मिटत नाहीये. एकीकडे व्ही शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याला विरोधकांचा तीव्र आक्षेप कायम आहे. त्यात माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नव्या पवित्र्याने अजूनच भर घातलीये.

पन्नीरसेल्वम हे जयललितांच्या स्मृतिस्थळावर जाऊन काही काळ ध्यानस्त बसले. या ध्यानामागचं नक्की कारण काय याबाबत चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर बोलताना त्यांनी अम्मांनीच रूग्णालयात असताना आपल्याला मुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपल्याला या पदावरून अपमानीत करून काढलं गेल्याचा आरोप केला.

अम्मांच्या शिकवणीमुळे हे सत्य जगासमोर आणण्यास आपल्याला भाग पाडल्याचं त्यांनी सांगितलं.पन्नीरसेल्वम यांच्या या कृत्यामुळे शशिकला यांच्या अडचणी अधिकच वाढल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 11:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading