'ज्यांच्याकडून शिकलो...त्यांच्याचकडून सुरूवात..',अमित ठाकरेंची फेसबुकवर धडाकेबाज एंट्री

'ज्यांच्याकडून शिकलो...त्यांच्याचकडून सुरूवात..',अमित ठाकरेंची फेसबुकवर धडाकेबाज एंट्री

  • Share this:

07 फेब्रुवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे फेसबुकवर एंट्री केली. फेसबुकवर अमित ठाकरे यांचं अधिकृत फेसबुक पेज लाँच करण्यात आलंय. आणि अवघ्या 2 तासांमध्ये त्यांच्या फेसबुक पेजला 10 हजारहुन अधिक लाईक मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपले वडील राज ठाकरे यांचं स्केचही पोस्ट केलं.

amit_thackery_fbमहापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे घराण्याची आणखी एक पिढी राजकारणात उतरलीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे प्रचारात उतरणार असा प्रचार मनसेसैनिकांकडून दोन दिवसांपासून करण्यात येत होता. आज ठरल्याप्रमाणे अमित ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुकपेजचा शुभारंभ केला. सुरुवातील अमित ठाकरे फेसबुक लाईव्ह चॅट करतील असा काही जणांनी अंदाज बांधला होता. पण अमित ठाकरे यांनी आपण आपलं अधिकृत फेसबुक पेज सुरू करत असल्याचं स्पष्ट केलं.

अमित ठाकरे यांनी पोस्ट करून आपण फेसबुक पेज का सुरू करतोय याबद्दल खुलासाही केला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:रेखाटलेलं राज ठाकरे यांचं स्केचही पोस्ट केलं. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय 'ज्यांच्याकडून शिकलो... त्यांच्याचकडून सुरूवात...'

अमित ठाकरेंची पहिली पोस्ट...

नमस्कार,

माझं स्वतःच official Facebook page सुरू करण्यामागची भूमिका खर तर खूपच साधी होती.

गेले काही महिने मी माझ्या बाबांबरोबर खूप फिरत होतो. त्यावेळी मला माझ्या विचारसरणीचे खूप लोकं भेटत होते. त्यांना त्यांचे विचार माझ्या समोर मांडायचे होते तसेच 'अमित ठाकरे' म्हणून माझे विचार समजून घ्यायला ते उत्सुक होते. पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांशी संवाद साधायला खूप वेळ लागणार. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला Facebook page चा पर्याय वापरतोय.

एकाच वेळी अनेक लोकांना एकत्र भेटणं, एकमेकांना समजून घेणे, विचार, कल्पना यांची देवाणघेवाण करणे हा यामागील मूळ उद्देश आहे. या माध्यमातून मला माझे राजकीय तसेच सामाजिक विचार तुमच्याकडे व्यक्त करायचे आहेत. त्याचबरोबर माझ्या आत दडलेल्या व्यंगचित्रकाराला तुमच्या समोर आणायचे आहे.

मी आशा करतो की या माध्यमातून मी माझ्या मनातील विचार, कल्पना तुमच्या समोर मांडू शकेन.

धन्यवाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 10:08 PM IST

ताज्या बातम्या