तुमचं काय काय घसरेल ते पाहा, उद्धव ठाकरेंचा पलटवार

  • Share this:

Devendra and uddhav07 फेब्रुवारी : हार्दिक पटेलच्या 'मातोश्री' भेटीवरुन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपलीये. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरल्यानंच हार्दिक पटेलला मुंबईत बोलावल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. त्याला उद्धव ठाकरेंनीही लगेचच उत्तर दिलंय. आमचं काय घसरेल ते आम्ही पाहू, तुमचं काय घसरेल ते पाहा असा प्रतिटोला लगावलाय. चळवळीतला एक मुलगा 'मातोश्री'वर आला त्यावर एवढा गहजब कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

मुंबईतील घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीरसभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. दहशतवादी हल्ल्यात बळी कमी गेले पण नोटाबंदी बळी अधिक गेले.मग हा दहशतवादी हल्ला केला कोणी? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

हार्दिक पटेल कोणतीही युती करण्यासाठी आला नव्हता. पण  हार्दिक पटेल मातोश्रीवर आले तर काहींच्या पोटात गोळा आला.काहींनी शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असे म्हणाले आमच्या पाया खालची वाळू सरकली पण तुमच्या खालून काय सरकेल ते पहा असा टोला लगावत फडणवीस एकटे नको. सगळे एकत्र या असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं.

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न होता. मी हात जोडून विनंती केली आणि अर्ज मागे घेतले. काही व्यक्तिगत राहिले त्यांना ही विनंती की, माणूस नाही शिवसेनेकडे पाहून विचार करा जर विचार करणार नसाल तर शिवसेनेतून बाहेर काढावे लागेल असा इशाराही त्यांनी बंडखोरांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 09:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading