उच्चशिक्षित तरुणाने संपवलं कुटुंब ; पत्नी,दोन मुली आणि एका मुलाची केली हत्या

उच्चशिक्षित तरुणाने संपवलं कुटुंब ; पत्नी,दोन मुली आणि एका मुलाची केली हत्या

  • Share this:

nagar_news07 फेब्रुवारी : पत्नी, दोन मुली आणि एका मुलाची बापानेच धारदार हत्याराने हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमधल्या लोणी गावात घडलीये. आरोपी उच्चशिक्षीत आहे पण मानसिक संतूलन बिघडल्यामुळे त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

राहता तालुक्यातील देवीचंद ब्राम्हणे हा एम.ए.बीएड इंग्रजी विषय घेऊन पास झालेला. 15 वर्षांपूर्वी त्याचं संगितासोबत लग्न झालं. पत्नी संगीता, 14 वर्षांची निशा, 12 वर्षांची नेहा आणि 6 वर्षांचा हर्ष यांची त्याने हत्या केली. देवीचंद गेल्या 4 वर्षांपासून मानसिकरित्या आजारी आहे, त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असावं असं आरोपीचे वडील हिराचंद ब्राम्हणे यांचं म्हणणं आहे. दरम्यान, मृत संगीतच्या भाऊ सागर बनसोडे याने देवीचंदने कृत्य केलं नाही असा आरोप केलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 09:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading