स्थानिक भाषा मराठीच, 'एचडीएफसी'ची अखेर दिलगिरी

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 09:08 PM IST

स्थानिक भाषा मराठीच, 'एचडीएफसी'ची अखेर दिलगिरी

07 फेब्रुवारी : महाराष्ट्रात स्थानिक भाषा मराठीच असून फोन बँकिंगमधील संवादाची भाषा मराठीच आहे असं जाहीरपणे कबुली देत एचडीएफसी बँकेनं दिलगिरी व्यक्त केलीये. तसंच ती चूक गुगलने केली आहे असं खापरही त्यांनी गुगलवर फोडलंय.

गुगल सर्च इंजिनमध्ये मुंबईतील एचडीएफसी बँकेंच्या फोन बँकिंगचा नंबर सर्च केला असता नंबर तर दिसत होता पण स्थानिक भाषा ही गुजराती असल्याचं समोर आल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होता.

आज मनसेनं ठाण्यातील एचडीएफसीच्या शाखेवर हल्लाबोल केला  आणि बँकेला काळ फासतं पोस्टर झळकावली. तसंच ही चूक ताबडतोब बदला नाही तर लवकरच तुम्हाला जोरदार आंदोलनाचा सामना करावा लागेल असा इशाराही मनसेनं दिला होता.अखेरीस एचडीएफसी बँकेनं दिलगिरी व्यक्त करत स्थानिक भाषा मराठीच असल्याचं जाहीर केलंय.

एचडीएफसीचा दिलगिरीनामा

'' सोशल मीडियावरील काही पोस्‍ट्स मधून असे दिसून आले आहे की गुगल सर्च मध्ये ‘एचडीएफसी बॅंकेच्‍या मुंबईतील फोन बॅंकिंग नंबर’ चा शोध घेतल्‍यास विसंगती दिसून येत होती. आम्‍ही तपासून पाहिले असता स्‍थानिक भाषा म्‍हणून 'गुजराती' असे गुगल सर्च मध्‍ये दिसून येत होते. आम्ही हे अधोरेखित करू इच्छितो की मुंबईत फोन बँकिंगसाठी स्‍थानिक भाषेचा पर्याय मराठी हाच असून, आम्‍हालाही हे कळू शकत नाही की गुगलच्‍या रिझल्‍ट्समध्‍ये तसे का प्रतीत होत नव्हते. आम्‍ही तातडीने हे प्रकरण गुगलला कळवले आणि गुगलने तातडीने ही विसंगती दूर केली. पहिल्या प्रमाणेच आमचे ग्राहक फोनबँकिंग क्रमांक ०२२ ६१६० ६१६१ द्वारे  पर्याय ३ निवडून, आमच्‍या फोन बँकिंग प्रतिनिधीशी मराठीत संवाद साधू शकतील. यामुळे अनवधानाने जर कोणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील तर आम्‍ही त्‍या बद्दल दिलगिरी व्‍यक्‍त करतो.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close