S M L

ट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 08:02 PM IST

ट्रम्प यांच्या प्रवेशबंदी निर्णयाला फेसबुकसह 95 कंपन्यांचं डिसलाईक

 07 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी 7 देशांवर घातलेल्या प्रवेशबंदीवरून अमेरिकेत खळबळ माजलीय. आता या निर्णयाच्या विरोधात गुगल, अॅपल, फेसबुकसह 95 टेक कंपन्या एकत्र आल्यायत. ट्रम्प यांनी बंदी घातलेल्या मुस्लीम देशांतल्या नागरिकांना प्रवेश मिळावा यासाठी या कंपन्यांनी कायदेशार लढाई सुरू केलीय.

डॉनल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधात काढलेल्या आदेशाविरोधात या कंपन्यांनी निषेध नोंदवलाय. त्यामुळे आता या लढ्यात अमेरिकेच्या जास्तीत जास्त कॉर्पोरेट आणि औद्योगिक क्षेत्रातल्या अनेक कंपन्या उतरतील, असं बोललं जातंय.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि सामाजिक रचनेमध्येच स्थलांतरितांची भूमिका महत्त्वाची आहे, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्स, उबर या सगळ्या कंपन्यांनी या लढ्यात उडी घेतलीय.याआधी, अमेरिकेत सिअॅटलच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिलीय. ट्रम्प यांनी घातलेल्या प्रवेशबंदीविरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 08:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close