News18 Lokmat

जाहीरनाम्यात भाजप-सेनेची अशीही 'युती'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2017 07:36 PM IST

जाहीरनाम्यात भाजप-सेनेची अशीही 'युती'

07 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केला. तर दुसरीकडे भाजप आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात मुंबईकरांना 24 तास पाण्यासह अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.

बाळासाहेबांचं स्मारक करण्याचं आश्वासनंही यात आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात  सेनेचे अनेक मुद्दे हायजॅक करून सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला दिसतोय.

मुंबईकरांना कोण काय देणार?

Loading...

१- सेना - खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार

भाजप - खड्डेमुक्त रस्ते होईपर्यंत कर नाही

२- सेना - बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना

भाजप - बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक बांधणार

३ . सेना - 24 तास पाण्यासाठी गारगाई, पिंजाळ प्रकल्प मार्गी लावणार  भाजप - मुंबईकरांना 24 तास पाणी

४. सेना - महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन

भाजप - राईट टू पी अंतर्गत महिला शौचालयांसाठी अधिक बजेट

५. सेना - मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार

भाजप - मलनिसाःरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करणार

६ . सेना - महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच  भाजप - महापालिकेत राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस कायदा येणार

७. सेना - शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बससेवा मोफत  भाजप - महापालिका शाळांसाठी स्वतंत्र बससेवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...