News18 Lokmat

अमित शहा कोल्हापूरचे जावई हे त्यांच्याकडूनच कळलं -चंद्रकांत पाटील

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2017 07:15 PM IST

अमित शहा कोल्हापूरचे जावई हे त्यांच्याकडूनच कळलं -चंद्रकांत पाटील

07 फेब्रुवारी : शिवसेनेला निवडणुका कठीण जाणार आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांना बोलावण्यात आलं मुळात पराभव दिसू लागल्यानंच शिवसेनेचं आकांडतांडव सुरू आहे अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर केली. तसंच अमित शहा कोल्हापूरचे जावई आहे याबद्दलही त्यांनी खुलासा केला.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलखुलास उत्तर दिली. भाजपमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. आता त्यांच्यासोबत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कार्यकर्ते आले. पण त्यांना वेळीच घरचा रस्ता दाखवण्यात आला असंही पाटील यांनी सांगितलं.

अभाविपमध्ये असताना अमित शहा यांच्यासोबत संबंध जुळून आले. विधानसभेच्या वेळी अमित शहा महाराष्ट्रात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली होती.  राज्यात आले तेव्हा त्यांना मी शिवसेनेसोबत चांगलं बोलू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही आमची कामगिरी चोख बजावली. जेव्हा अमित शहा अंबाबाईच्या दर्शनाला ते कोल्हापूरला आहे. तेव्हा आम्हाला कळलं ते कोल्हापूरचे जावई आहे. पण, आता त्यांचे नातेवाईक हे मुंबईला असता त्यामुळे अमित शहांच्या सासरचा माणूस आहे म्हणून माझी प्रगती झालं असं काही नाही असा खुलासाही पाटील यांनी केला.

भाजपची ताकद वाढली याची जाणीव शिवसेनेनं ठेवली पाहिजे. महापालिकेच्या युद्धात दोन्ही पक्षांनी सामंज्यस्यानं घ्यावं निवडणूक युद्ध मानल्यानं जास्त कटुता येते. पालिकेतल्या कटुतेचा राज्य सरकारवर परिणाम होणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तसंच टोल बंद करण्याचा निर्णय़ दोन वेळा घेतला होता पण आर्थिक गणित न जुळल्यामुळे तो निर्णय घेता आला नाही. आता वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांचं काम यामुळे टोल बंदीचा निर्णय घेता येणं शक्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...