S M L

एचडीएफसी बँकबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा राडा

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2017 05:59 PM IST

एचडीएफसी बँकबाहेर मनसे कार्यकर्त्यांचा राडा

07 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं मराठी भाषेचा मुद्दा हाती घेत आंदोलन केलंय. ठाण्यात एचडीएफसी बँकेतील पोस्टरला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासळलंय.

एचडीएफसी बँकेचा गुगलवर फोन नंबर सर्च केला असला   प्रातिक भाषा गुजराती असा उल्लेख होता. त्याचा निषेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या तलावपाळी इथल्या एचडीएफसीच्या शाखेत जाऊन तिथल्या पोस्टरवर काळं फासलं आणि मराठीचा अपमान करणार नाही असं पोस्टर लावलं. पोलीस तिथे पोहोचेपर्यंत मात्र मनसे कार्यकर्ते फरार झाले.

दरम्यान, मनसेनं पुन्हा एकदा मराठीचा एल्गार पुकारला आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या वेबसाईटवर मुंबईची स्थानिक भाषा म्हणून गुजरातीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही चूक ताबडतोब बदला नाही तर लवकरच तुम्हाला जोरदार आंदोलनाचा सामना करावा लागेल असं आव्हान मनसेचे उपाध्यक्ष अमृत खोपकर यांनी एचडीएफसी बँकेला दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 05:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close