Elec-widget

नाराजी कायम ठेवून नसीम खान प्रचारात

नाराजी कायम ठेवून नसीम खान प्रचारात

  • Share this:

Naseem-Khan

07 फेब्रुवारी : गुरुदास कामत यांच्या पाठोपाठ आता काॅंग्रेस नेते नसीम खान हेखील पक्षाकरता मुंबईत आता प्रचार करणार आहेत. असं असलं तरीही खान यांची मुंबई काॅंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधातील नाराजी मात्र कमी झालेली नाहीये.

IBN लोकमतशी बोलताना त्यांनी पक्षासाठी प्रचार करणार असल्याचं सांगतानाच पक्षापेक्षा कोणीही मोठा नाहीये असा टोमणा निरुपम यांना मारला आहे. कामत यांच्यासोबत नसीम खान आणि कृपाशंकर सिंह हे मुंबईत पक्ष प्रचारात सहभागी होणार नसल्याची माहिती कळली होती. आता मात्र नसीम खान हे प्रचारात उतरणार असून कृपाशंकर सिंह यांची नाराजी मात्र कायम असल्याची माहिती कळते आहे.

त्यामुळे एकीकडे प्रचारात हे नेते सहभागी होताना त्यांची निरुपम यांच्या विरोधातली नाराजी कमी झाली आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...