भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

  • Share this:

bjp ghoshnanama

07 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 24 तास पाणी देण्याबरोबर खड्डेमुक्त रस्ते केल्याशिवाय पथकर घेणार नसल्याची आश्वासनं या जाहीरनाम्यात त्यांनी दिलीत.तसंच राईट टू म्युन्सिपल सर्व्हिस मुंबईकरांना देणार असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आश्वासन देत भाजपनं शिवसेनेला कोंडीतच पकडलंय.

पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार असल्याचंही मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणालेत. मुंबईचे रस्ते धूळविरहीत करण्यासाठी पाण्यानं धुण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. भाजपनं हा जाहीरनामा स्टँप पेपरवर प्रसिद्ध केला.

भाजपचा जाहीरनामा

काय आहे मुंबईकरांसाठी?

१ -मुंबईत जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा

२ -मुंबईत ५ नवी वैद्यकीय महाविद्यालयं उघडणार

३-मुंबईकरांना ५ लाख रुपयांचं विमा संरक्षण

४-पाण्यावरील कर ५ वर्षे स्थिर राहणार

५-भ्रष्टाचार करणाऱ्यांवर 'मोक्का'

६ -करचोरी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 टक्के बक्षीस

७-ओसी नसलेल्या मुंबईतल्या सर्व इमारतींना वर्षभरात ओसी

८-मुंबईच्या पूर्व किनाऱ्यांचा विकास

९ -एका सिंगल तिकिटावर मुंबईभर प्रवास

१० -पालिका शाळेतील अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा धडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 03:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading