'जाॅली एलएलबी 2'चा मार्ग मोकळा,आक्षेपार्ह दृश्यांना कात्री

'जाॅली एलएलबी 2'चा मार्ग मोकळा,आक्षेपार्ह दृश्यांना कात्री

  • Share this:

akshay-kumar-79

07 फेब्रुवारी : अक्षय कुमारच्या आगामी 'जॉली एलएलबी २'चा रिलीजचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात निर्मात्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय. न्यायव्यवस्थेचा अपमान करणारे सीन चित्रपटातून काढून टाकू, असं आश्वासन निर्मात्यांनी कोर्टाला दिलंय. ते मान्य करत चित्रपट रिलीज करता येऊ शकतो, असं आदेश कोर्टानं दिले.

नांदेडमधील वकील अजय कुमार एस वाघमारे यांनी हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली होती. 'या चित्रपटामध्ये वकिली पेशा आणि न्यायव्यवस्था यांना हास्यास्पद रितीने दाखवण्यात आलं आहे.'असा आक्षेप घेतला होता. त्यावर हायकोर्टानं या सगळ्या वादग्रस्त दृष्यांवर पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले.

'जाॅली एलएलबी 2'ला सेन्साॅरनं पास केलं होतं. पण सिनेमाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading