S M L

यशवंतराव मुक्त विद्यापिठातर्फे लतादिदींना डाॅक्टरेट

Sonali Deshpande | Updated On: Feb 7, 2017 12:33 PM IST

Lata Mangeshkar1312

07 फेब्रुवारी : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डी.लिट पदवीने त्यांचा सन्मान होणार आहे.मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी ही माहिती दिली.

मुंबईत राज्यपालांच्या हस्ते एका विशेष समारंभात लवकरच त्यांना पदवीप्रदान करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या २३व्या पदवीप्रदान सोहळ्यात लता मंगेशकरांचा हा सन्मान होणारेय.विद्यापीठाने २०११मध्ये आशा भोसले यांना डी.लिट पदवी देऊन गौरव केला आहे. विद्यापीठानं यापूर्वी वि. वा. शिरवाडकर, शांताबाई दाणी, बाबा आढाव यांना डी.लिट उपाधीने सन्मानित केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 12:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close