'रईस'ला पाकिस्तानात लाल कंदील

  • Share this:

raees1

07 फेब्रुवारी : 'रईस' आता पाकिस्तानात रिलीज होणार नाही. पाकिस्तान सेन्साॅर बोर्डानं रईस रिलीज करायला नकार दिला. त्यांच्या मते, सिनेमात मुसलमानांना नकारात्मक दाखवलंय. त्यांना दहशतवादी दाखवलंय.

पाकिस्तानात रईस 10 फेब्रुवारीला रिलीज होणार होता. त्यासाठी शाहरूख खानच्या टीमनं पूर्ण तयारीही केली होती. वितरकांची पाकिस्तान सेन्साॅर बोर्डासोबत तशी बोलणीही झाली होती.

गेले चार महिने पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी होती. ही बंदी नुकतीच हटवली गेली होती. त्यानंतर 3 फेब्रुवारीला काबील रिलीज झाला होता. पण सध्या तरी रईसला लाल कंदील दाखवलाय.

पाकिस्तानात शाहरूख खानचे बरेच फॅन्स आहेत. शिवाय पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची सिनेमात भूमिका आहे. त्यामुळे पाकिस्तानी सिनेप्रेमींची निराशा झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 08:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading