अखेर मुंबई पालिकेसाठी गुरूदास कामत करणार काँग्रेसचा प्रचार

  • Share this:

Gurudas kamat21314

07 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरुदास कामत अखेर प्रचार करण्यासाठी तयार झाले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गंत वादामुळे कामत यांनी महापालिका निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण कार्यकर्त्यांचा विनंतीनंतर कामत आता महापालिकेच्या प्रचाराला लवकरच लागणार आहेत.

मुंबई महापालिकेचे बिगुल वाजू लागताच कामत विरुद्ध संजय निरुपम असा वाद रंगू लागला होता. हा संघर्ष टोकाचा गेल्याचं चित्र वारंवार दिसून आलं होतं. मुंबई महापालिकेच्या उमेदवारी निवड, प्रचाराच्या प्रक्रियेतून आपण अजिबात सहभागी होणार नसल्याचं कामत यांनी जाहीर केलं होतं. तसंच पक्ष निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांच्यासोबत मुंबई काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकांवरही कामत यांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे पक्षात काही आलबेल नाही, पक्ष गटबाजीत अडकला असल्याचं सातत्याने दिसून आलं होतं. त्यानंतर आता अखेर कामत कार्यकर्त्यांच्या विनंतीवरुन प्रचारात सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 7, 2017, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading