S M L

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक; हार्दिक पटेल आज मातोश्रीवर!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2017 09:41 AM IST

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक; हार्दिक पटेल आज मातोश्रीवर!

07  फेब्रुवारी :  राज्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आर या पारच्या भुमिकेत असताना, आज शिवसेनेनं मास्टर स्ट्रोक लगावलांय. गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी ठरलेला हार्दिक पटेल, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत दाखल झालांय. आज (मंगळवारी) दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतीये.

गुजरातमध्ये पटेल समाजाचा तरूण नेता हार्दिक पटेलने, आरक्षण आंदोलनांचे वादळ निर्माण केलं. त्याच्या या आंदोलनाने भाजप सरकारच्या विरोधात रान पेटवलं. परिणामी भाजपची व्होट बँकच, त्यांच्या विरोधात उभी राहिली. पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर हार्दिकवर पोलिसांनी कठोर कारवाई केली होती. त्याला काही महिने गुजरातमध्ये प्रवेशबंदी घातली होती.


मात्र, आता याच पाटीदार समाजाचा नेता महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी मुंबईत दाखल झालां आहे. त्यामुळे मुंबईतील गुजराती समाज आपलीच व्होट बँक समाजाणार्या भाजपला शाॅकच बसलांय. आज हार्दीक पटेल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचीही माहीती मिळतेय. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत, हार्दीक पटेलच्या प्रचाराने वेगळेच रंग भरलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 08:38 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close