मुंबई भाजपमध्ये अंतर्गत महाभारत

मुंबई भाजपमध्ये अंतर्गत महाभारत

  • Share this:

bjp_mahabharat4    

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई

06 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात महाभारत सुरू झाल्याचा आवेश भाजपात दिसला खरा...पण तिकीट वाटपानंतर भाजप निष्ठावंत आणि उपरे या चक्रव्युव्हमध्ये अडकली. पक्षात दिगजांमध्ये अंतर्गत महाभारत सुरु झालाय. याचाच परिणाम पाहता प्रचाराच्या शुभारंभाकडे मंत्री आणि आमदारांनी पाठ फिरवली.

मुंबइ महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारचा नारळ वाढवण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात सर्व मंत्री आणि आमदार अपेक्षित होते. पण 15 पैकी 10 आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यात विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर, ज्या दक्षिण मुंबईत कार्यक्रम होता त्याचे प्रमुख मंगलप्रभात लोढा गैरहजर होते.परकीयांशी लढता लढता भाजपात अंतर्गत महाभारत सुरु झालाय. अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालीय. भाजपमध्ये सुरू असलेला महाभारत असं..

 

- मुख्यमंत्री विरूद्ध आशिष शेलार

तिकीट वाटपाचे अधिकार आमदार खासदार यांना देऊन आशिष शेलार यांचे पंख कापले.

- प्रकाश मेहता विरोधात किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री

मेहता यांनी अजय बगल यांच्यासाठी भालचंद्र शिरसाठ यांचा पत्ता कट केला होता. पण मुख्यमंत्री हाताशी घेत किरीटने हस्तक्षेप करत शिरसाठ यांना उमेदवारी दिली.

वर्सोवामध्ये भरती लव्हेकर यांना मुख्यमंत्र्यां अभय दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा आरोप होतोय.

पूनम महाजन आणि आशिष शेलार-

किरण शिरवळकर या निष्ठावंताला डावलून पूनम यांनी सुषम सावंत यांना तसंच अबताब शेख यांना उमेदवारी दिली यावरून दोघात वाद

कुर्लामधील सर्व तिकीटवाटपाचे अधिकार पूनम महाजन यांना देण्यात आले, त्यामुळे शेलार नाराज.

प्रसाद लाड विरुद्ध भाजप जुनी टीम

प्रसाद लाड यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलत 8  तिकीट स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप होतोय. विजय पगारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं तिकीट दिलं. प्रसाद लाड यांना मुख्यमंत्र्यांचं अभय असल्याने जुनी भाजप मुख्यमंत्र्यांवर नाराज आहे.

मंगलप्रभात लोढा विरुद्ध राज पुरोहित

राज पुरोहित याचा मुलगा चा अपवाद वगळता दक्षिण मुंबई मध्ये लोढा यांनी कुणालाही हस्तक्षेप करू दिला नाही. यामुळे मुख्यमंत्री आणि शेलार हतबल ठरले.

राम कदम विरुद्ध प्रकाश मेहता

घाटकोपर वेस्ट मधील तिकीट वाटप करताना प्रकाश मेहता समर्थकांना डावलत तीनही उमेदवार कदम यांच्या मर्जीतले.

या सर्व दिगजांची लढाई पाहता शिवसेना विरोधात लढण्यासाठी भाजप या पक्षांतर्गत चक्रव्युव्ह मधून बाहेर पडेल का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय.  स्वछ आणि पारदर्शी कारभाराच्या मुद्यावर भाजपनं मिशन 115 जाहीर केलाय. अशा परिस्थिती त भाजप कुठपर्यंत मजल गाठणार हे लवकरच समजेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 10:49 PM IST

ताज्या बातम्या