भाजप अजगर,नागोबा ; उद्धव ठाकरेंची टीका

भाजप अजगर,नागोबा ; उद्धव ठाकरेंची टीका

  • Share this:

uddhav_thackery406 फेब्रुवारी : मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि यांनी नागोबा आणि अजगरासारख्या 114 जागा मागायच्या अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केलीये.

मुंबईत चांदवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपचं हुतात्मा स्मारकावर जाणं हे नाटक आहे. जर शपथ घ्यायची असेल तर महाराष्ट्राच्या अखंडत्वाची शपथ घ्या असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलं.

केंद्रात सरकार भाजपचं राज्यात भाजपचं आता काय मुंबई गिळायला निघालाय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा पाठिंबा घेण्याअगोदर कुणाच्या पाठिंब्यानं बहुमत सिद्ध केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

होय, आमचे मतभेद आहेतच - शहा म्हणतात, उत्तरप्रदेश मध्ये सत्तेत आल्यानंतर शेतक-यांचे कर्ज माफ करणार पण इथे महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रातील शेतक-यांचे कर्ज माफ करा अशी मागणीह ठाकरे यांनी केली.

भाजपाला आज राम मंदिर कसं आठवलं. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत कसं मंदिर आठवलं. पण ही लोकं मंदीर वही बनाएँगे, ताऱीख नही बताएँगे असा टोलाही उद्धव यांनी लगावला.  कल्याण - डोंबिवली च्या निवडणुकीत 6500 कोटी रुपयांचे पँकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण प्रत्यक्षात अजून एक रुपयाही मिळाला नाही. डोंबिवलीमधील 27 गावातील ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यानी फसवणूक केली अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच मुंबईत मोदींची सभा झालीच पाहिजे. मोदींच्या सभेनंतरही मुंबईत शिवसेनाच जिंकणार आहे.  शिवसेनेच्या पाठिंब्या अगोदर फडणवीस यांनी कुणाच्या पाठिंब्याने सरकार राखल याच पारदर्शी उत्तर द्या असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 10:34 PM IST

ताज्या बातम्या