मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात महिलांचा पडला विसर

 मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात महिलांचा पडला विसर

  • Share this:

cm_live_Show06 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी आॅनलाईन प्रचार फंडा आजमावला. पण, या कार्यक्रमात एकाही महिलेचा प्रश्न न आल्यामुळे भाजपला महिलांचा विसर पडल्याचं समोर आलंय.

भाजपचा आॅनलाईन प्रचार करण्यासाठी भाजपनं 'आपलं शहर आपला अजेंडा' हा लाईव्ह कार्यक्रम केलाय. या कार्यक्रमात मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे,  आशिष शेलार यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तर दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक होत असलेल्या 10 महापालिकेवर चर्चा केली.

त्याच बरोबर या महापालिका क्षेत्रातले प्रतिनिधी बोलावलेत. यात 20 तरुणांना प्राधान्य देण्यात आलं. एकामागून एक प्रश्न विचारत असताना माहिलाबाबत प्रश्न उपस्थित करू या असं निवेदिका पल्लवी जोशी बोललात. पण यांच्या लाईव्ह कार्यक्रमात एकही महिलेचा समावेश नाही, असं निवेदिकेला लक्षात आलं.

आपल्या कार्यक्रमात महिला नाही याच निवेदिकेला आश्चर्य वाटलंच, पण मुख्यमंत्री यांचा चेहराच पडला. महिलांचे प्रश्न कोण विचारणार ? असा प्रश्नच  निवेदिकेलाच पडला.

त्यांनीच राईट टू पी चा प्रश्न उपस्थित केला. पण उपस्थित असलेल्या पैकी एकाने हा मुद्दापुढे नेत वेळ निभावून नेली.  स्थानिक स्वराज्य संथाच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना आरक्षण आहे. अशा प्रसंगी भाजपला महिलांचा विसर पडावा याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 08:43 PM IST

ताज्या बातम्या