शरद पवारांबद्दल बोलणार नाही पण राष्ट्रवादीवर विश्वास नाही -संजय निरुपम

शरद पवारांबद्दल बोलणार नाही पण राष्ट्रवादीवर विश्वास नाही -संजय निरुपम

  • Share this:

sanjay_nirupam406 फेब्रुवारी : 'संजय निरुपम मूर्ख माणूस आहे' अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पण त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. शरद पवार हे मोठं व्यक्तिमत्व आहे अशी प्रांजळ प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली. पण, राष्ट्रवादीवर विश्वास नाही. ते कधी भाजपला साथ देतील याचा नेम नाही अशी टीकाही दुसरीकडे केली.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चामध्ये काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. एकीकडे अमित शहा फ्रेंडली मॅच म्हणताय, दुसरेकडे भाजप नेते पुन्हा युतीची भाषा करत आहे. खरंतर शिवसेना-भाजपला निवडणुकीत पराभव दिसत आहे म्हणून युती तोडण्याचा ड्रामा केलाय.निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचं हे षडयंत्र असून हे भाजप शिवसेना युती तुटली हे निव्वळ नाटक आहे अशी टीका संजय निरुपम यांनी केली.

राष्ट्रवादीशी आघाडी होऊ शकली नाही.  राष्ट्रवादीसोबत आघाडी न करण्याचा काँग्रेस नेत्यानी एकमताने निर्णय घेतला होता. मी काँग्रेस हायकमांडकडे हा निर्णय कळवला आणि तोच निर्णय योग्य असल्याचं कळवलं. आघाडी न घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले. राष्ट्रवादीवर विश्वास नाही राष्ट्रवादी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आधी राष्ट्रवादीनं भाजपच्या संबंधांबाबत भूमिका स्पष्ट करावी मग आघाडीवर बोलावं असं आवाहनच संजय निरूपम यांनी केलं.

तसंच काँग्रेसनं कुणाशीही संधान बांधलं नाही आरोप सिध्द करा, नाहीतर माफी मागा असं आव्हानच संजय निरूपम यांनी भाजपला दिलं.  शिवसेना- भाजप फेरीवाल्यांकडून 300 कोटींची हफ्ता वसुली करतं असा आरोपही संजय निरूपम यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या