'त्या' चुकीमुळे सेनेच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून लढण्याची वेळ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 08:01 PM IST

shiva sena 106 फेब्रुवारी : नाशिकमध्ये ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना चुका झाल्यानं शिवसेनेच्या दहा उमेदवारांना फटका बसलाय. या दहा जणांना शिवसेनेचं पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या उमेदवारांवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आलीये.

अपक्ष म्हणून लढणाऱ्या या शिवसैनिकांना एकच चिन्ह द्यावं अशी मागणी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी केलीय. तसंच AB फॉर्म वाटपात आमच्याकडून तांत्रिक चुका झाल्यात असंही देसाई यांनी मान्य केलं. मात्र, अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या या शिवसैनिकांना आता विजयासाठी आणि मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. तर तिकीटासाठी पैसा हे भाजपचं राजकारण उघड झाल्याचा आरोप अनिल देसाईंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...