इथेही 'नादखुळा',घरात तिकिटांची खैरात

इथेही 'नादखुळा',घरात तिकिटांची खैरात

  • Share this:

KOP-ZP

संदीप राजगोळकर,06 फेब्रुवारी : राजकारण म्हटलं की घराणेशाही ही आलीच.मग कोल्हापूर तरी याला कसं अपवाद राहील? कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी आपल्याच घरात उमेदवारी ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचं चित्र दिसतंय.

कोल्हापूरमध्ये भाजप-जनसुराज्य आणि आरपीआय एकत्र लढताहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढताहेत. त्यामुळे जीव तोडून प्रचार करणारे कार्यकर्ते, आपल्या नेत्यासाठी राबणारे कार्यकर्ते हे या निवडणुकीच्या पटलावरून गायब झाल्याचं कोल्हापूरमध्ये दिसून येतंय.

जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा समजली जाते.त्यामुळेच या नेत्यांनी आपापल्या कुटुंबातल्या सदस्यांची वर्णी या निवडणुकीत लावलीय. विशेष म्हणजे आरक्षण असल्यामुळे जरी अडचण आली असली तरी, मुलगा, मुलगी, सून, जावई, पुतणी या नात्यांचा आधार घेत या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.

पाहूयात कोल्हापूरमधली ही नात्यांची निवडणूक

कोण कोण आहे निवडणुकीच्या रिंगणात?

भाजप आमदार अमल महाडिक यांची पत्नी शौमिका महाडिक

माजी आमदार भरमू पाटील यांची कन्या ज्योती पाटील

माजी आमदार स्व. नरसिंगराव पाटील यांचा मुलगा महेश पाटील

माजी खासदार निवेदिता मानेंची सून वेदांतिका माने

शिवसेना नेते संजय मंडलिक यांचा मुलगा विरेंद्र मंडलिक

माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश घाटगे

माजी आमदार बजरंग देसाई यांची सून रेश्मा देसाई

माजी खासदार स्व.उदसिंगराव गायकवाड यांचा नातू रणवीरसिंह गायकवाड

माजी आमदार यशवंत पाटील यांचा मुलगा अमर पाटील

माजी आमदार पी.एन.पाटील यांचा मुलगा राहूल पाटील

आमदार चंद्रदीप नरके यांचा भाऊ अजित नरके

ही नावं पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की कोल्हापूरच्या राजकारणात घराणेशाही किती आहे ते.पण निवडणुकीच्या निकालानंतर या सगळ्याचं राजकीय भवितव्य समजणार हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 03:32 PM IST

ताज्या बातम्या