आता डाव्यांनाही घराणेशाहीचा मोह आवरेना

आता डाव्यांनाही घराणेशाहीचा मोह आवरेना

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर

06 फेब्रुवारी :  महापालिकेचा रणसंग्राम जोरदार सुरू असतानाच आता राजकारणातील घराणेशाहीची विविध उदाहरणं पाहायला मिळतायत. यात उजव्या विचारांच्या भाजपापासून ते डाव्या सीपीएमच्या नेत्यांनाही घराणेशाहीचा मोह आवरला नाहीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत आलेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यानी आपल्या चिरंजीवाचे लाड पुरविण्यासाठी चक्क पक्षातील विद्यमान आणि ज्येष्ठ नगरसेवकाचेच तिकीट कापलेय. मात्र बडा नेता असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी धजावत नाहीयत.

SOLAPUR121

व्यवसायाने डॉक्टर असलेले पालकमंत्र्यांचे पुत्र किरण मात्र आपल्या उमेदवारीबाबत खुश असून वडिलांनी केलेल्या कामाचा दाखला देतायत.

इतकंच काय तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या मुलीला तिकीट देवून घराणेशाही केल्याची टीका सातत्याने करणारे सीपीएमचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी स्वतःच्या मुलीला आणि पत्नीला तिकीट दिलेय. याबाबत ते देखील गजब युक्तीवाद करताना दिसतात.

पक्ष कोणताही असो घराणेशाही ही अबाधित राहणार असल्याचा इशाराच या नेत्यांनी आपल्या कृतीतून दिलाय. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंज्याच काढत राहाव्या लागणार हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 02:35 PM IST

ताज्या बातम्या