अमेरिकन्सना पुन्हा हवेत ओबामा

अमेरिकन्सना पुन्हा हवेत ओबामा

  • Share this:

obama-vs-trump

06 फेब्रुवारी: प्रामाणिक अमेरिकन जनतेला बराक ओबामाच आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे आहेत, असं नुकतंच एका सर्व्हेतून सिध्द झालंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदाचा भार स्वीकारून दोन आठवडे झाले असले तरीही स्थानिकांना अजूनही ते पचवणं जड जातंय, असंच यातून दिसतंय. डोनाल्ड यांना त्या पदावरुन हटवलं पाहिजे, असंही काही लोकांचं म्हणणं आहे, असं तो सर्व्हे सांगतोय.

पब्लिक पॉलिसी पोलिंगने केलेल्या या सर्व्हेत 52 टक्के लोकांना ओबामांच्या सुनियोजित आणि शिस्तबध्द कार्यकाळाची आठवण झाली. ते या पदावर बराक यांना पुन्हा बघायची इच्छा व्यक्त करताना दिसले. मात्र त्याच सर्व्हेतील 43 टक्के लोक मात्र डोनाल्ड यांच्या राष्ट्राध्यक्ष असण्यावर समाधानी आहेत.

पब्लिक पॉलिसी पोलिंगचे अध्यक्ष डिन डेबनाम म्हणाले की, 'सामान्यत: नव्या राष्ट्राध्यक्षांची लोकप्रियता सर्वोच्च असते आणि कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या या वेळेचा ते आनंद घेतात. मात्र डोनाल्डच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. अमेरिकेतील बरीच जनता त्यांच्यावर महाभियोग खटला दाखल करू इच्छिते आणि ती संख्या 40 टक्के इतकी आहे. तर बरीच जनता ओबामांना पुन्हा त्या पदावर पाहू इच्छिते आणि ते प्रमाण 35 टक्क्यांइतकं आहे.'

याच सर्व्हेतील 65 टक्के लोकांना डोनाल्ड यांचा मुस्लिमांना देशात प्रवेशबंदीचा निर्णय अजिबात आवडलेला नाही तर 26 टक्के लोकांना ते योग्यच वाटतंय. पब्लिक पॉलिसी पोलिंगने लिस्टेड 725 लोकांमध्ये जानेवारीच्या अखेरीस हा सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 12:00 PM IST

ताज्या बातम्या