वारकर्‍यांना आषाढीचे वेध

वारकर्‍यांना आषाढीचे वेध

1 जूनमान्सूनसोबतच वारकरी, शेतकर्‍यांना पंढरीच्या विठूरायाच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. 21 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आहे. त्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 3 जुलैला, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून 5 जुलैला पंढरपूरकडे रवाना होणार आहे. या दोन्ही पालख्या 6 जुलैला पुण्यात एकत्र येणार आहेत. त्यानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होतील. एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 जुलैला पालख्या पंढरपुरात दाखल होतील.या आषाढी सोहळ्याची तयारी आता सुरू झाली आहे.

  • Share this:

1 जून

मान्सूनसोबतच वारकरी, शेतकर्‍यांना पंढरीच्या विठूरायाच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. 21 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आहे.

त्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 3 जुलैला, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून 5 जुलैला पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

या दोन्ही पालख्या 6 जुलैला पुण्यात एकत्र येणार आहेत. त्यानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होतील.

एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 जुलैला पालख्या पंढरपुरात दाखल होतील.

या आषाढी सोहळ्याची तयारी आता सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2010 12:23 PM IST

ताज्या बातम्या