आता प्रियदर्शनचं 'नमस्कार मंडळी...'

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 12:25 PM IST

आता प्रियदर्शनचं 'नमस्कार मंडळी...'

priydarshan

06 फेब्रुवारी: गेली तीन वर्ष 'नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे, मजेत ना' या निलेश साबळेच्या आवाजाची अवघ्या महाराष्ट्राला सवय झालीये, पण पुढचे काही दिवस त्याचा तो ओळखीचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार नाहीये. त्याच्या जागी प्रियदर्शन जाधव सूत्रसंचालन करणारेय.

डॉ.निलेश सध्या आजारी आहे आणि त्याला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांनी त्याला काही वेळ कामांपासून लांब राहायला सांगितलंय म्हणून तो काही 'चला हवा येऊ द्या'च्या चित्रीकरणाला हजर राहू शकणार नाही. मग शो मस्ट गो ऑन या तत्त्वानुसार कार्यक्रम काही बंद ठेवता येणार नाही. म्हणून मग पुढचा महिनाभर या कार्यक्रमाचं निवेदन प्रियदर्शन जाधव करणारे. प्रियदर्शन जाधव जरी हा कार्यक्रम काही दिवस सांभाळणार असला तरी निलेशची कमतरता वाटत राहणार,हे नक्की.

hawa

निलेश 'चला हवा....'चं निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन ,अभिनय आणि कधी कधी गायनही करतो. त्याने त्याच्या टीमसोबत संपूर्ण महाराष्ट्राला हसवलं. विनोदातून त्याने आपला मोठा चाहता वर्ग बनवलाय. याच चाहत्यावर्गाच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत आणि म्हणूनच तो लवकर बरा होईल. थोड्याच दिवसात आपल्याला त्याचा आवाज ऐकायला मिळेल, अशी आशा बाळगुयात.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 09:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...