मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारराजांशी लाईव्ह चॅटद्वारे साधणार संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारराजांशी लाईव्ह चॅटद्वारे साधणार संवाद

  • Share this:

aawaz Pparicaks

06 फेब्रुवारी :  आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपाचा जाहीरनामा बनवण्यासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (सोमवारी)6.15 वाजता नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 'आवाज परिवर्तनाचा' असं आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपने ‘आपलं शहर - आपला अजेंडा’ शहराच्या विकासाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात; त्याचा भाजपाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याची घोषणा भाजपाने केली होती. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 7 दिवसांत 5 लाख 50 हजार 272 लोकांनी प्रत्यक्ष फोन करून, 89 हजार 417 लोकांनी व्हॉटस्अपवर तर 23 हजार 337 लोकांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.

आतापर्यंत राजकीय पक्षांनी स्थानिकांच्या खऱ्या समस्या आणि व्यथांकडे दुर्लक्ष करत परस्पर घोषणापत्रं आणि जाहीरनामे तयार केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरनामा तयार करण्याच्या कामात लोकांनाच सामावून घेतलं आहे. त्यामुळे जाहीरनामा अधिक वास्तववादी आणि लोकांच्या खऱ्या गरजांना प्राधान्य देणारा असेल, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 12:02 PM IST

ताज्या बातम्या