बायकोच्या डोक्यात घातला प्रचाराचा नारळ; सेनेच्या उमेदवाराचा प्रताप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 09:34 AM IST

बायकोच्या डोक्यात घातला प्रचाराचा नारळ; सेनेच्या उमेदवाराचा प्रताप

Thane Naral

06 फेब्रुवारी :  शिवसेनेच्या प्रभाग 16 मधील ठाण्यातील एका उमेदवारानं पत्नीलाच प्रचारासाठी आणलेला नारळ फेकून मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात सेनेचे उमेदवार माणिक पाटील यांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या उमेदवाराने भलतेच ‘करून दाखवल्या’ने या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

सेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटील आणि त्यांचे पती माणिक पाटील यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. या वाद प्रकरणाचा खटला ठाण्याच्या कौटुंबिक न्यायालयात सुरू असून, गेल्या तीन वर्षांपासून हे दाम्पत्य वेगळे राहतात. त्या वादातून एकदा संगीता पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, अशी तक्रारही दाखल आहे.

यंदा शिवसेनेने संगीता पाटील यांना उमेदवारी न देता माणिक पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे या दाम्पत्यामधील वाद आणखी विकोपाला गेला आहे. माणिक पाटील रविवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत असताना संगीता पाटील त्याच ठिकाणी काही मतदारांशी चर्चा करत होत्या.

इतकी वर्ष कुठे होता असा पती माणिक पाटील यान प्रश्न करताच झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर माणिक पाटील यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ फेकून मारला. पाटील यांनी धक्काबुक्कीही केल्याचा आरोप संगीता पाटील यांनी केला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...