नाशिक 'पदवीधर'ची आज मतमोजणी

  • Share this:

56election_counting

06 फेब्रुवारी : विधान परिषदेसाठी प्रतिष्ठेची लढत बनलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज अंबड वेअर हाऊस येथे होतेय. मतमोजणी केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानं या भागास छावणीचं रूप आलंय. रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आघाडीचे मावळते आमदार डॉ सुधीर तांबे आणी भाजपचे डॉ प्रशांत पाटील या दोघात प्रमुख लढत मानली जात असली तरी डॉ तांबे यांचा विजय निश्चित मानला जातोय.

पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली येथे एकूण 30 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सर्व मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. यानंतर मतपत्रिकांचे 50-50 या संख्येनुसार गठ्ठे तयार केले जातील. येथे विशिष्ट मतसंख्येचा कोटा ठरवून त्या दिशेने मतमोजणीस पुढील टप्प्यात सुरुवात होईल. यानंतर दुसऱ्या फेरीत प्रत्येक टेबलवर एक एक हजार मतपत्रिका दिल्या जातील. या हजार पत्रिका उमेदवारनिहाय मोजण्यात येतील. यानुसार प्रत्यक्ष मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार आहेत. यातून पहिल्या क्रमांकाचे मतदान मोजले जाईल. कोटा गाठला नसल्यास पुन्हा नंतरची फेरी पार पडेल. त्यात सर्वात कमी मतदान पडलेल्या उमेवाराचे दुसऱ्या क्रमांकापासून पुढील क्रमांची मते मोजली जातील. यानंतर सर्वात अखेरच्या उमेदवाराकडून मतमोजणीस सुरुवात होईल. अखेरीलाही कोटा न गाठला गेल्यास सर्वाधिक मते पडलेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येईल. या निवडणुकीतील चिठ्ठीपध्दती लक्षात घेता अंतिम निकाल हाती येण्यासाठी मध्यरात्रही उलटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 09:18 AM IST

ताज्या बातम्या