S M L

27 गावांच्या ठरावावरून साहित्य संमेलनात वाद

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 09:55 PM IST

27 गावांच्या ठरावावरून साहित्य संमेलनात वाद

05 फेब्रुवारी : डोंबिवली इथल्या 90व्या साहित्य संमेलनाचं आज सूप वाजलं. डोंबिवली साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात झालेल्या ३० ठरावांमध्ये कल्याण डोंबिवलीच्या हद्दीतील २७ गावांबाबत झालेल्या ठरावावरून वाद निर्माण झाला. शिवसेनेने संमेलनातल्या या ठरावाचा जाहीर निषेध केला. शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ठरावासाठी हे योग्य व्यासपीठ नसल्याचं ठासून सांगितलं. मात्र त्यामुळे संमेलनाचा समारोप हा साहित्यापेक्षा या राजकीय ठरावाच्या वादामुळेच गाजला.

या समारोपाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. 'अब्दुल कलामांचा जन्मदिन वाचक दिन म्हणून साजरा केला तेव्हा दोन कोटी पुस्तकांचे वाचन झाले. आता यंदाच्या मराठी भाषादिनी इंटरनेटवर मराठी वाढावी हा शासनाचा प्रयत्न असेल. त्यासाठी विकिपीडिया, इंटरनेटवर कोट्यवधी पाने टाकण्याचा संकल्प केला आहे.'असं म्हणत विनोद तावडे यांनी मराठी भाषा आणि साहित्य याबाबतच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं.

कला ही राजश्रित असू शकत नाही त्यामुळे आम्ही साहित्य, कलेला पुरस्कृत करू, असे उद्गार काढत मराठी भाषा आणि साहित्य याबाबतच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 08:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close