S M L

शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 09:20 PM IST

शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या- उद्धव ठाकरे

05 फेब्रुवारी : भांडुप इथे उद्धव ठाकरेंच्या झालेल्या सभेत त्यांनी भाजपला चांगलंच लक्ष्य केलं.भाजपच्या उमेदवारांची हुतात्मा चौकात घेतलेल्या शपथेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. हुतात्मा चौकात शपथ घ्यायची होती तर ती अखंड महाराष्ट्राची घ्या, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

14 जागा दिल्या असत्या तर पारदर्शकता आली असती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. येत्या काही दिवसांत काही लोकं मित्रो मित्रो म्हणत येतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत मोदींना त्यांनी टोलाही लगावला.विजयाची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 'मुंबईकर असल्याचं काही जणांना सांगावं लागतं,त्यांच्यात पारदर्शकता कधी येते त्याची आम्ही वाट बघतोय.' असंही ते म्हणाले. ' वशिला असता तर युती तुटली नसतीच.' असा टोमणाही त्यांनी मारला.

राज्याच्या कारभारात पारदर्शकता हवी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.'मुंबईला तळहाताच्या फोडासारखी जपतो, मुंबईत केलेल्या कामांवर बोला ना?' असं सांगत भांडुपकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्याचा वादाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 09:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close