S M L

शिवसेनेचं राज्यात आणि राज्याबाहेर मॅचफिक्सिंग-दानवे,शेलार यांचा आरोप

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 07:38 PM IST

शिवसेनेचं राज्यात आणि राज्याबाहेर मॅचफिक्सिंग-दानवे,शेलार यांचा आरोप

05 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची मॅचफिक्सिंग असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसनंही 40 वॉर्डात मॅचफिक्सिंग केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय.

शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांना मदत व्हावी आणि भाजपच्या उमेदवाराला टक्कर देता यावी यासाठी कमजोर उमेदवार देत असल्याचं शेलार म्हणाले. शेलार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत रावसाहेब दानवेंनीही शिवसेनेवर आरोप केले. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर शिवसेना इतर पक्षांसोबत छुपी युती करीत असल्याचा आरोप दानवेंनी केलाय.

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्षपदं  आणि सर्वाधिक नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर राहिली त्याचप्रमाणे महापालिका,जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजप सर्वाधिक यश मिळवून नंबर वन पार्टी असेल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी  व्यक्त केला.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना त्यांनी शपथ दिली  आणि प्रचाराचा शुभारंभ केला.

वाय.बी. चव्हाण सभागृहात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 07:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close